लीकी, विल्यम एडवर्ड हार्टपोल
लीकी, विल्यम एडवर्ड हार्टपोल : (२६ मार्च १८३८-२२ ऑक्टोबर १९०३). सुप्रसिद्ध आयरिश इतिहासकार आणि निबंधलेखक. त्याचा जन्म डब्लिनजवळ न्यूटन पार्क येथे सधन कुटुंबात झाला. त्याने महाविद्यालयीन शिक्षण चेल्टनहॅम ट्रिनिटी कॉलेज (डब्लिन) यांत घेऊन पदवी मिळविली (१८५९).